"कोरोनामुळे जग बंद करणार का?"; मनसेचा ठाकरे सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:50 PM2021-08-16T15:50:09+5:302021-08-16T15:50:46+5:30
MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government : शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे.
मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शहर शाखेच शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल. यावेळी पत्रकाराशी बोलताना शर्मिला ठाकरे (MNS Sharmila Thackeray) यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे. पुढे बोलताना त्यांनी युद्ध पातळीवर लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. लसीचे दोन डोस बंधनकारक करता मग लसीकरण ही जबाबदारी सरकारचीच आहे असा टोला देखील शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे.
मनसेच्याडोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या उदघाटन प्रसंगी भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. मनसे भाजपा युतीचीच चर्चा सुरू आहे. मात्र यावर मनसे भाजपाचे ज्येष्ठ नेते काही वक्तव्य करत नसले तरी मनसे भाजपाची वाढलेली जवळीक युतीचे संकेत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यावर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे निर्णय घेतला जाईल अस मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केलंय. आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचे उद्घाघाटन केलंय. आम्ही ताकाला जाऊन भांडे लपवत नसल्याचही ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल असून शहरातील विविध मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. त्यामुळे सेना भाजपाची युती निवडणुकी अगोदर होते की निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांची मैत्री खुलते? मनसे आणि भाजपमध्ये युती होणार की नाही? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जाताहेत. मात्र निवडणुकीच्या वेळी कोण कोणाला खुलेआम पाठींबा देतो किंवा पडद्या मागून कशाप्रकारे एकमेकांना छुपी मदत केली जाते का? या सर्व रंजक गोष्टी येणाऱ्या काही दिवसांत आपल्याला समजतील.