माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या

By अनिकेत घमंडी | Published: February 22, 2023 06:43 PM2023-02-22T18:43:48+5:302023-02-22T18:46:03+5:30

माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या सुरू आहेत. 

 MNS-Shiv Sena is on Twitter over the traffic caused by the Mankoli bridge  | माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या

माणकोली पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मनसे शिवसेनेत ट्विटरवर कुरघोड्या

googlenewsNext

डोंबिवली: माणकोली पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून आगामी काळात तो प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर डोंबिवली ते मुंबई प्रवास सुसाट होणार असला तरी त्या पुलामुळे डोंबिवलीसह मोठागाव परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे काय असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर द्वारे करून शिंदे गटाच्या शिवसेनेला चिमटा काढला.

त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच राजकीय वर्तुळात त्या ट्विटची चर्चा सुरू होती. ते ट्विट मध्ये म्हणाले की २०१६ पासून हा मार्ग तयार होणार असल्याची बतावणी केली जात आहे, प्रत्यक्षात हा पूल झाला तरी मोठागाव रेल्वे उड्डाणपूल आणि त्याला जोडणारे रुंद रस्ते होणे गरजेचे आहेत असा टोला लगावला. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही तातडीने आमदार पाटील यांच्या ट्विटला पाटील यांना टॅग करत काळजी नसावी... असे म्हणत प्रतिउत्तर देत म्हंटले।की, निश्चितच पलावा येथील जंक्शनच्या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी मोठागाव येथे होणार नाही. 

त्यासाठी मोठा गाव ते कोपर रेल्वे स्टेशन येथे रेल्वे फाटकाच्या जागी उड्डाणपूल करण्यासाठी १८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्याला रेल्वेची मान्यता देखील।मिळालेली असून रेल्वे वरील भागाची वर्क ऑर्डर देखील झालेली आहे, तसेच रिंग रोड टप्पा क्रमांक ३ या माध्यमातून मोठा गाव ते दुर्गाडी किल्ला निविदा प्रकिया देखील सुरू झाली असल्याचे म्हंटले आहे. एकूणच काय तर या दोन्ही परपसर विरोधी ट्विटरवरील कुरघोड्यांनी शहरातील अन्य राजकीय नेते, कार्यकर्त्यांना माणकोली विषयावर काथ्याकूट करायला वेळ, विषय मिळाल्याची चर्चा रंगली होती.

 

Web Title:  MNS-Shiv Sena is on Twitter over the traffic caused by the Mankoli bridge 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.