नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका
By मुरलीधर भवार | Published: September 28, 2023 04:25 PM2023-09-28T16:25:06+5:302023-09-28T16:26:47+5:30
गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे.
कल्याण - गणपती उत्सव जोरात साजरा झाला. आज गणेश विसर्जन आहे. मात्र रस्त्यावर राजकीय नेत्यांनी कमानी लावल्यामुळे विसर्जन मिरवणूक अडथळा निर्माण होत आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी कमानी लावणाऱ्या नेत्यांवर सडेतोड टीका केली आहे. हे गणराया पुढच्या वर्षी आगमनापूर्वीच यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्याच खाडीत विसर्जन करुन इथल्या नागरीकांना सुखाचे व आनंदाचे दिवस दिसू दे अशी प्रार्थना केली आहे.
गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. मात्र कल्याण पश्चिमेतली छत्रपती शिवाजी चौकात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने मोठया कमानी लावल्या आहेत. या कमानीवर महामंडळाचे सदस्य आणि सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो झळकले आहेत. मात्र या कमानी मुळे वाहन चालकांना त्रास होतोच तसेच बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला अडथळा निर्माण झाला आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात लावण्यात आलेल्या कमानीमुळे विसर्जन करण्यासाठी मूर्त्या कशाबश्या रस्त्याने पुढे काढल्या. कमीत कमी या नेत्यांना कमानी लावण्या आधी काही अडथळा होणार की नाही याचा विचार झाला पाहिजे. मागच्या वर्षी अशाच कमानी पडल्याचे घडना घडल्या होत्या. काही वाहनांचे त्यामुळे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेता मनसे आमदार यांनी याकडे लक्ष वेधण्याकरीता ट्वीट केले आहे.
गेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतु त्यावरून कोणताही शहाणपणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही.आता तर थेट बाप्पाच्या मिरवणूकीत अडवणूक या कमानीने करून ठेवली आहे....
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 28, 2023
हे गणराया पुढल्या वर्षी आपल्या आगमनापुर्वीच यांच्या राजकीय… pic.twitter.com/3qMKwsCYQw
काय आहे ट्वीट
गेल्या वर्षी राजकीय नेत्यांनी लावलेल्या कमानी पडून अपघात झाले होते. परंतू त्यावरुन कोणताही शहापणा या राजकीय नेत्यांना आणि पालिका प्रशासनाला आला नाही. आत्ता तर थेट बाप्पांच्या मिरवणूकीत अडवणूक या कमांनी करुन ठेवली आहे. हे गणराया पूढच्या वर्षी आपल्या आगमनापूर्वी यांच्या राजकीय मुजोरीचे इथल्यास खाडीत विसर्जन करुन इथल्या नागरीकांना सुखाचे आणि आनंदाचे दिवस दिसू दे.