Crime news: अट्टल मोबाईल चोराला पोलीसांनी केली अटक; साडेतीन लाखाहूनही अधिक किंमतीचे मोबाईल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 08:08 PM2021-10-08T20:08:35+5:302021-10-08T20:16:07+5:30

Crime news: डोंबिवली, कोळसेवाडी, मानपाडा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल  झाल्या होत्या.  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा  पुन्हा अशीच घटना घडली.

mobile thief arrested by police in Dombivali; worth more than Rs 3.5 lakh devices seized | Crime news: अट्टल मोबाईल चोराला पोलीसांनी केली अटक; साडेतीन लाखाहूनही अधिक किंमतीचे मोबाईल जप्त 

Crime news: अट्टल मोबाईल चोराला पोलीसांनी केली अटक; साडेतीन लाखाहूनही अधिक किंमतीचे मोबाईल जप्त 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीमध्ये  गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर  तपास करत असताना मानपाडा पोलिसांनी  एका स-हाईत गुन्हेगाराला  अटक करत  त्याच्याकडून  तब्बल  31 स्मार्ट फोन  जप्त केले आहेत. 

डोंबिवली, कोळसेवाडी, मानपाडा आदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाइल चोरी झाल्याचे तक्रारी दाखल  झाल्या होत्या.  मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा  पुन्हा अशीच घटना घडली. या तक्रारीचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपी सुफियान बागवान याला  पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक करण्यात आलीये. इतकंच नाही तर मोबाईल   चोरी साठी  रिक्षाचाही वापर करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पोलिसांनी एक रिक्षा सुद्धा जप्त केलीये. 

 22 ऑगस्ट रोजी  कल्याण ग्रामीण परिसरात  पिंपळेश्वर मंदीराच्या पाठीमागील गेट समोरील रोडवर रामकुमार मुन्सी सिंह  हे पायी चालत असताना  दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी इसमानं त्यांचा  मोबाईल खेचून  नेला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुप्त बातमीदारामार्फत जबरी चोरी करणारा सराईत चोरटा सुफीयान उर्फ सद्दो मलीक बागवान ( वय 25) याला भिवंडीचे नवीन वस्ती मधून पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक करण्यात आलीये. त्याच्याकडून ३ लाख ४० हजार रूपये किंमतीचे एकूण 31 मोबाईल तसेच 1 रिक्षा जप्त करण्यात आलीये. 

    आरोपी बागवान याचा अजून कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहे. मोबाईल चोरताना रिक्षाचा सुद्धा वापर करण्यात आल्याने आता चोरी करण्यासाठी चोरटे अनेक शक्कल वापरत असल्याच समोर आलंय. त्यामुळे  आता कल्याण  डोंबिवली करांनो बाहेर फोनवर बोलताना सावधान! असच म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: mobile thief arrested by police in Dombivali; worth more than Rs 3.5 lakh devices seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.