Corona Vaccination: कल्याण डोंबिवलीत आजपासून मोबाईल व्हॅन लसीकरणास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 06:56 PM2021-07-07T18:56:24+5:302021-07-07T18:57:11+5:30
खडेगोळवलीत आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने आजपासून मोबाईल व्हॅन लसीकरणास सुरुवात केली आहे. त्याच्या शुभारंभ आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी वैशाली काशीकर आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅन लसीकरणासाठी आजपासून चार बस घेण्यात आलेल्या आहेत. एका बसमध्ये लसीकरण तर दुस:या बसमध्ये 30 मिनीटासाठी लस घेणा:यास निरिक्षणासाठी बसवून ठेवले जाईल. महापालिका हद्दीतील चाळ वजा आणि झोपडपट्टी विभागात लसीकरण कमी झाले आहे. लसीकरण वाढविण्यासाठी मोबाईल व्हॅन द्वारे फिरते लसीकरण सुरु केले आहे. सुरुवातीला चार बसेसमध्ये सुरु करण्यात आले आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून त्याचे प्रमाण वाढविले जाईल अशी माहिती आयुक्त सूर्यवंशी यांनी दिली आहे. आत्तार्पयत महापालिका हद्दीतील 3 लाख 75 हजार जणांचे लसीकरण पार पडले आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅन लसीकरणास पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 700 जणांनी या मोबाईल व्हॅनमध्ये लसीचा डोस घेतला. आय प्रभाग कार्यालया अंतर्गत जाईबाई विद्या मंदीर, साईनगर याठिकाणी लसीकरण करण्यात आले. उपायुक्त सुधाकर जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर, डॉ. पूर्वा भानूशाली याठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांचे लसीकरण महात्मा फुले आरोग्य केंद्रात आज करण्यात आले. आज दिवसभरात 150 माथाडी कामगारांनी लस घेतली आहे.