लहान मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; हायफ्रोफाईल गृहसंकुलातील घटना

By प्रशांत माने | Published: September 23, 2024 03:17 PM2024-09-23T15:17:32+5:302024-09-23T15:18:03+5:30

असे नेमके काय घडले की पुजाने त्यानंतर मुलीची हत्या करून स्वत: देखील जीवन संपविले याचा तपास पोलिस करीत आहेत.

Mother commits suicide by killing her little daughter; Occurrences in Hyprophile Home Complexes | लहान मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; हायफ्रोफाईल गृहसंकुलातील घटना

लहान मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; हायफ्रोफाईल गृहसंकुलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: अडीच वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुर्वेकडील रूणवाल मायसिटी या हायफ्रोफाईल गृहसंकुलात रविवारी रात्री घडली. याची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रूणवाल मायसिटी टॉवर नंबर ५ मध्ये राहुल सकपाळ ( वय ३२) हे आई स्नेहा ( वय ६४), पत्नी पूजा ( वय २९) आणि मुलगी समृध्दी ( वय २ वर्षे ६ महिने) असे राहतात. ऐरोलीमधील एका कंपनीत सिनीअर असोसिएट पदावर असलेले राहुल रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोसायटीतील मिटींगसाठी गेले होते. घरी पत्नी पूजा, मुलगी समृध्दी आणि आई स्नेहा होत्या. स्नेहा या पायाने अपंग असून त्यांना चालताना इतरांची तसेच वॉकरची मदत घ्यावी लागते. सात वाजता मिटींग संपल्यावर घरी आलेल्या राहुल यांनी बाहेर फिरण्यास जात असून चायनीज खाऊन येतो, असे पूजाला सांगितले. रात्री आठ वाजता ते घरी परतले. परंतु दरवाजा उघडला नाही म्हणून पूजा यांच्या मोबाईलवर कॉल केला. पण उचलला नाही. पूजा प्रतिसाद देत नाही म्हणून आई स्नेहा यांना मोबाईलवर कॉल करून पूजा फोन उचलत नाही सांगत दरवाजा उघडायला सांगितले.

थोडयाच वेळात राहुल यांना घरातून आई स्नेहा यांच्या ओरडण्याचा आवाज आला. आईने दरवाजा उघडताच घरातील हॉलमधील सिलिंग फॅनला पुजाने साडीच्या साह्याने गळफास घेतला होता. तर जमिनीवर निपचित पडलेल्या अवस्थेतील मुलगी समृध्दीच्या गळ्याभोवती रूमाल गुुंडाळलेला होता. तसेच बाजुला उशी पडली होती. राहुल यांनी आईला घडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता मी बेडरूममध्ये झोपली होती असे सांगितले. पूजा कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तर समृध्दीला खाजगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे सांगितले.

मिटींग दरम्यान पुजाचा फोन

सोसायटीच्या मिटींग दरम्यान ५ वाजून १० मिनिटांनी पूजाचा राहुल यांना फोन आला. परंतू ते मिटींगमध्ये असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. मिटींग सुरू असल्याचा व्हाटसअप मेसेज पूजाला केला. दऱम्यान सात वाजता राहुल घरी आले व नंतर चायनीज खाण्यासाठी बाहेर गेले पण असं नेमके काय घडले की पुजाने त्यानंतर मुलीची हत्या करून स्वत: देखील जीवन संपविले याचा तपास पोलिस करीत आहेत.
 

Web Title: Mother commits suicide by killing her little daughter; Occurrences in Hyprophile Home Complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.