आधारवाडी डंपिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीवर मदर कल्चरचा उतारा
By मुरलीधर भवार | Published: March 7, 2023 06:29 PM2023-03-07T18:29:07+5:302023-03-07T18:31:23+5:30
जागरुक नागरीक फाऊंडेशनचा पुढाकार, मदर कल्चर तयार करण्याचे काम सुरु
कल्याण-कल्याण शहरातील आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कच:याच्या ादरुगधीवर मदर कल्चरचा वापर करुन दुर्गंधी दूर केली जाणार आहे. या कल्चरच्या वापरामुळे कच:याचे विघटन होणार आहे. यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे.
जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने नागरीकांशी संबंधित शहरातील ९ प्रमुख प्रश्नावर २०१६ पासून पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने उपोषण करण्यात आलेले आहे. मागच्या आठवडय़ात फाऊंडेशनच्या शिष्टमंडळासोबत आयुक्तांची एक बैठक पार पडली. ९ प्रश्नांपैकी कच:याची समस्या दूर करण्याचा मुद्दा आहे. आधारवाडी डंपिंगवरील कचरा विघटन आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी मदर कल्चर तयार करण्याचे काम फाऊंडेशनच्या पुढाकाराने कालपासून सुरु केले आहे.
फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर आणि सदस्या चेतना रामचंद्रन, महेश बनकर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील आणि अधिकारी ऑगस्टीन घुटे यांच्यासमवेत एसटीपी प्लांटच्या जागेत मदर कल्चर तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे कल्चर पाच दिवसात तयार झाल्यावर त्याची प्रत्यक्ष कच:यावर फवारणी केली जाणार आहे. यापूर्वीही घाणेकर यांनी हे कल्चर महापालिकेस दिले होते. तेव्हा महापालिकेत त्यात स्वारस्य नव्हते. आत्ता फाऊंडेशनने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
काय आहे मदर कल्चर
केंद्र सरकारची गाजीयाबाद येथे नॅचरल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिग ही संस्था आहे. त्याठिकाणी देशी गायीच्या शेणाच्या वरच्या थरापासून बॅक्टेरीया विलग करुन हे कल्चर तयार केले जाते. २० मिली लिटरची बाटली अवघी १५० रुपयांना मिळते. १०० लिटर पाणी, एक किलो गूळ आणि त्यात २० मिली लिटरची छोटी बाटली टाकून द्रवण तयार करायचे. त्याला दिवसातून दोन वेळा ढवळत राहायचे. पाच दिवसात द्रवण तयार होते. १०० लिटर द्रवणापासून पुन्हा प्रति शंभर लिटर पाण्यात एक किलो गुळाचा वापर करीत लाखो लिटर मदर कल्चर तयार करता येते. त्याची फवारणी कच:यावर केल्यास दुर्गंधी दूर होऊन कचरा विघटीत होतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"