डोंबिवली स्टेशनवर पाहता येणार चित्रपट; सिने डोम उभारण्याचा ‘मरे’चा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:53 AM2023-09-23T06:53:25+5:302023-09-23T06:53:41+5:30
स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे
मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात चित्रपट पाहता येणार आहे.
स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकात सिने डोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिने डोम हा ग्राहक/अभ्यागत/पाहुण्यांसाठी जेवण/नाश्ता/पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे.
मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.स्थानकात पाच हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे.
प्रतिवर्षी राखीव किंमत
डोंबिवली : ४७,८५,४०० रु.
जुचंद्र : ३५,८२,००० रु.
इगतपुरी : १७,१०,४०० रु.
खोपोली : २३,३१,१०० रु.