रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन करण्यासाठी मुदत वाढ आणि विलंब दंड रद्द करण्याचे; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
By मुरलीधर भवार | Published: January 28, 2023 05:56 PM2023-01-28T17:56:54+5:302023-01-28T17:57:53+5:30
रिक्षा चालकांना दीड किलोमीटर मागे भाडे वाढ देण्यात आली आहे.
कल्याण-रिक्षा चालकांना दीड किलोमीटर मागे भाडे वाढ देण्यात आली आहे. रिक्षातील मीटरमध्ये २१ रुपये ऐवजी मीटर टाकताच २३ रुपये भाडे पडले पाहिजे. त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशन केले जात आहे. त्याकरीता दंड आकारा जात आहे. आकारण्यात येणारा दंड रद्द करुन रिकॅलिब्रेशनकरीता मुदतवाढ देण्यात यावी याकरीता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. त्यावर मुदताढ देऊन दंडही रद्द केला जाईल असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रणव दादा पेणकर यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी संतोष नवले, सुबल डे, जॉन कॅलिमिनो, नुर जमादार, विजय डफळ, सुनिल मोरे, निलेश रसाळ, संजय बागव यांनी खासदार शिंदे यांची काल भेट घेतली.
रिकॅलिब्रेशन केले नसल्यास १६ जानेवारी पासून प्रत्येक रिक्षा चालकाला प्रति दिवसाला 5क् रुपये दंड आकारला जात आहे. संघटनेच्या वतीने त्यासाठी मुदत वाढ मागितली होती. कल्याण आरटीओ क्षेत्रत ५५ हजार रिक्षा चालक आहे. त्यापैकी केवळ ९ हजार रिक्षा चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन केले आहे. रिकॅलिब्रेशनकरीता कल्याण आरटीओ क्षेत्रत केवळ चारच कंपन्या कार्यरत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रिक्षा चालकांच्या मागण्या लक्षात घेता मीटर रिकॅलिब्रेशनची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवून दिली जाईल. तसेच आकारण्यात येणारा दंडही रद्द करण्यात येईल असे आश्वासन खासदार शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"