भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Published: September 27, 2022 06:24 PM2022-09-27T18:24:31+5:302022-09-27T18:24:49+5:30

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. 

MP Shrikant Shinde said that action must be taken against those who create illusions  | भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

भ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे; श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Next

कल्याण : मी लोकप्रतिनिधी या शहराची जबाबदारी माझी आहे. रस्त्यासह विकास कामांकरीता पाचशे ते सहाशे कोटीच्या निधीची कामे पाऊस थांबल्यावर सुरु होणार या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे अशी प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. रस्त्यासंदर्भात मनसेकडून लावण्यात आलेल्या टिकेवर खासदार शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एमओयू झाला नाही तर वेदांत फॉक्सकॉन कंपनी इथे आली कशी आणि गेली कशी, भ्रम निर्माण करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे असाही टोला खासदार शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

वेदांत बाबत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता त्यानंतर भाजपने आदित्य ठाकरे यांनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती याबाबत खासदार शिंदे यांनी एमआयडीसी कडून एक परीपत्रक जाहीर केले आहे त्यावरुन हे स्पष्ट होते आहे की विरोधक अफवा पसरवत होते प्रत्यक्षात जागा दिली नाही एम ओ यू झाला नाही मग कंपणी इथे कशी आली? आणि कशी गेली याबाबत भ्रम निर्माण केली गेल्याचे शिंदे यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी हे चांगले पाऊल होते जे चांगले आहे जे लोकांच्या हिताचे निर्णय आहेत हे या सरकारने घेतले आहे. गेल्या अडीच महिन्यात ४५० पेक्षा जास्त निर्णय या सरकारने घेतले आहेत, बघतो पाहतो बोलतो अभ्यास करतो असं हे सरकार करत नाही, एवढे निर्णय झालेत लोकं सरकारच्या बाजूने आहेत हे विरोधकांच्या डोळ्यात खुपते आहे असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
 

Web Title: MP Shrikant Shinde said that action must be taken against those who create illusions 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.