"ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील आणि सोबत पोपट आहेच"
By मुरलीधर भवार | Published: November 25, 2023 03:05 PM2023-11-25T15:05:00+5:302023-11-25T15:05:20+5:30
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका
कल्याण-आदित्य ठाकरे यांनी या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला. शिंदे म्हणाले की, ते आता भविष्यच पाहण्याचे काम करतील. भविष्य कोण पाहतो. सोबत पोपट आहेच. या शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर टीका केली.
खोणी पलावा येथे शिवसेना कल्याण ग्रामीण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आदी मान्यवर उपस्थीत होते. खासदार शिंदे यांच्या स्वागतासाठी कल्याण ग्रामीणसह पलावा गृहसंकुलातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी शिंदे यांनी सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्यांचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी सत्तेवर आलेल्यापासून जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. सगळ्यात जास्त आणि झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री असा त्यांचा नावलौकिक आहे. सगळ्यांना न्याय मिळाले. विकासाला कुठेही निधी कमी पडणार नाही याची जातीने काळजी घेणारे मुख्यमंत्री आहेत.
कल्याण ग्रामीणमधील नागरिकांना हे संपर्क कार्यालय हक्कचे आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या घेऊन याव्यात त्या सोडविल्या जातील अशी ग्वाही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण खोणी रस्ता, कल्याण शीळ रस्ता, मेट्रो पलावामार्गे कल्याण तळोजा अशी राहणार आहे. त्याची निवदिा काढण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण हे रस्त्यांच्या जाळ्यांसह मेट्रोने नवी मुंबईशी जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले