श्रीकांत शिंदे यांची "ती" वर्तणूक अपेक्षित नव्हती, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे; राष्ट्रवादीची मागणी
By मुरलीधर भवार | Published: September 23, 2022 03:43 PM2022-09-23T15:43:08+5:302022-09-23T15:43:26+5:30
खासदार डाॅ श्रीकांत शिंदे याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ,या फोटोत श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करण्यात आला आहे.
कल्याण-
खासदार डाॅ श्रीकांत शिंदे याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ,या फोटोत श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करण्यात आला आहे.या फोटोवरून विरोधकांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली .याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे अशी मागणी केली.
पुढे बोलताना रामायणाच्या कथेत आम्ही लहानपणापासून अस वाचलं की भरत हे प्रभू रामचंद्रांचे बंधू होते ,आणि श्रीरामाचा वनवास असताना भरत यांनी श्रीरामाचे जोडे सिंहासनावर ठेवले आणि राज्यकारभार केला तर इकडे वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या खुर्चीवर बसून एका लोकप्रतिनिधीने ज्या पद्धतीची वर्तणूक केली ती, हिंदुत्वाचे नाव सांगणारे ,प्रभू श्रीरामाच्या संदर्भात बोलणारे त्यांच्याकडून अशा पद्धतीची वर्तणूक अजिबात अपेक्षित नाही ,डॉ श्रीकांत शिंदे हे आहेत ,जबाबदार लोकप्रतनिधी आहेत त्याच बरोबर ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत ,मुख्यमंत्र्यांच्या परिवाराला मर्यादा असतात त्यांना प्रोटोकॉल पाळावा लागतो ,आणि तिकडे सरे आम् त्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना निर्णय देत असाल तो व्हिडियो फोटो देश बघत असेल तर राज्यात आणि देशात कौटुंबिक गोष्टी मध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण करन्याचा प्रयत्न करताय या प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला ,एका लोकप्रतीनिधींने दुसऱ्या लोकप्रतिनिधींच्या खुर्चीवर बसणे हा निश्चित अपराध आहे ,याबाबत श्रीकांत शिंदे यांनी दीलगीरी व्यक्त केली पाहिजे ,सरकार सदर्भात आमचा वाद असला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याचा कुणालाच अधिकार नाही