खासदारांचा रात्री ३ वाजता आयुक्तांना फोन; सकाळीच यंत्रणा लागली कामाला
By मुरलीधर भवार | Published: October 25, 2023 03:42 PM2023-10-25T15:42:40+5:302023-10-25T15:43:28+5:30
सकाळीच केडीएमसीची यंत्रणा लागली कामाला
डोंबिवली-नवमीच्या दिवशी रात्री उशिरा डोंबिवलीतील गरीबीचा वाडा परिसरातील जगन्नाथ मंदिर येथील देवीचे दर्शन घेऊन रात्री ३ वाजता परत होते. रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी कचऱ्याचा ढीग दिसून आला. रात्री ३ वाजता खासदारांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना फोन वर याची कल्पना दिली. सकाळीच केडीएमसीची यंत्रणा कामाला लागली. हा रस्ता तातडीने स्वच्छ करण्यात आला.
दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असताना देखील महापालिकेचे आरोग्य अधिकारी उपायुक्त अतुल पाटील हे आरोग्य आधिकारी जेसिबी, डंपर, सफाई कर्मचारी घेऊन जागेवर हजर झाले. खाजगी मोकळ्या जागेवर कचरा मोठ्या प्रमाणात टाकल्या मुळे जमा होता, काल दसरा मेळावा आटोपून शिवसैनिक घरी पोहचत नाही. तोच पुन्हा खासदार शिंदे यांचा फोन उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांना आला. वेळ होती ११.४५ वाजताची. आज काय त्या रस्त्याचे. त्याठिकाणी कचरा उचलला गेला की नाही अशी विचारणा केली. कचरा उचलला गेला असल्यास त्याचे फोटो मला पाठवा असे खासदारांनी
सांगितले. त्यावर आज देखील त्याठिकाणी स्वच्छतेचा काम सुरु असल्याची माहिती उपजिल्हा प्रमुख कदम यांनी खासदार शिंदे यांना दिली.