मुजोर फेरीवाले हटले नाही; कल्याण डोबिवली महापालिका आयुक्तांची मोहीम फुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 02:19 PM2020-11-26T14:19:39+5:302020-11-26T14:23:28+5:30
महापालिकेने 1 नोव्हेंबरपासन फूट व रस्ते मोकळे करण्याचे मोहिम सुरु केली हाती. ही मोहिम फोल ठरल्याची उघड झाली आहे.
कल्याणमध्ये मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तान असल्यामुळे नागरीकांना त्यांचा त्रस सहन करावा लागतो. धक्कादाय़क म्हणजे वाहतूक पोलिस अधिका:याच्या आवाहनानंतर मुजोर फेरीवाले फूटपाथ व रस्तावरुन हटायला तयार नाही. व्यापा:यांनीही त्यांच्या गाडय़ा पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेने 1 नोव्हेंबरपासन फूट व रस्ते मोकळे करण्याचे मोहिम सुरु केली हाती. ही मोहिम फोल ठरल्याची उघड झाली आहे.
कल्याण डोबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे एखादी घोषणा करतात. त्याचा गाजावाजा होतो. मात्र काही दिवसानंतर त्यांच्या ही घोषणा हवेत विरुन जाते. कारण त्यांनी 1 नोव्हेंबरपासून फूटपाथ व रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहिम सुरु केली होती. आज परिस्थिती आहे की, कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते स्टेशन र्पयत फेरीवाल्यांनी रस्ता आणि फूटपाथ काजीब केला आहे.
इतकेच नव्हे तर व्यापा:यांनी त्यांच्या गाडय़ा रस्त्यावर पार्क केल्या आहे. नागरीकांसह वाहनचालकाना त्रस सहन करावा लागत आहे. ट्रफिक पोलिस अधिकारी सुखदेव पाटील यांनी त्यांच्या गाडीतून उद्धघोषणोद्वारे रस्ता आणि फूटपाथ नागरीकांसाठी मोकळा करा. ही तुमच्या बापदाद्याची जागा नाही. लोकांना त्रस देऊ नका या शब्दात फेरीवाल्यांसह व्यापा:यांना सुनावल्यानंतरही फेरीवाले आणि दुकानदार हे काही मागे हटले नाही. महापालिका आणि फेरीवाले दुकानदार यांच्यात साटेलोटे आहे हेच उघड झाले आहे.