मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

By अनिकेत घमंडी | Published: May 2, 2023 12:47 PM2023-05-02T12:47:14+5:302023-05-02T12:47:25+5:30

राज्यातील शाळांना विदर्भ वगळता २ मे ते १४ जून पर्यंत सुट्ट्या आहेत सुट्ट्या लागल्याने बहुतांशी शिक्षकांनी गावी जायचे बस व रेल्वे चे रिझर्वेशन केले होते. 

Mumbai teachers released from BLO jobs; Anil Bornare of BJP Teacher's Alliance held a discussion with the District Collector | मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

मुंबईतील शिक्षकांची बीएलओच्या कामातून सुटका; भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

googlenewsNext

डोंबिवली: मुंबईतील शिक्षकांना ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत बीएलओ चे काम दिल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती अखेर भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याने शिक्षकांची बीएलओ च्या कामातून सुटका झाली असून मुंबईतील शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शाळांना विदर्भ वगळता २ मे ते १४ जून पर्यंत सुट्ट्या आहेत सुट्ट्या लागल्याने बहुतांशी शिक्षकांनी गावी जायचे बस व रेल्वे चे रिझर्वेशन केले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी ५० वर्षाखालील शिक्षकांना बीएलओ ड्युटी च्या ऑर्डर निर्गमित केल्या होत्या याबाबत अनिल बोरनारे यांनी मुंबई उपनगर चे जिल्हाधिकारी यांना २९ एप्रिल रोजी निवेदन दिले होते तसेच १ मे रोजी त्यांच्याशी चर्चा करून माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती कायदा १९७७ व नियमावली १९८१ नुसार शिक्षकांना २ मे ते १४ जून पर्यंत मा. शिक्षण संचालकांनी उन्हाळी सुट्टी दिली असून त्याचे परिपत्रक निर्गमित केले असल्याने कोणत्याही शिक्षकांवर या कामाची सक्ती करू नये अशी मागणी केली अखेर जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे शिक्षकांवर सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट करून अधिकाऱ्यांना सूचना देत असल्याचे सांगितले त्यामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्टीचा आनंद उपभोगता येणार आहे

Web Title: Mumbai teachers released from BLO jobs; Anil Bornare of BJP Teacher's Alliance held a discussion with the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.