मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व

By अनिकेत घमंडी | Published: February 27, 2024 03:04 PM2024-02-27T15:04:34+5:302024-02-27T15:04:44+5:30

सावरकर पुण्यतिथी दिनी तेथे जाण्याचा अनेकांना आला योग, शेवडे एक तपाहुन अधिक काळ  स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अंदमानातील सेल्युलर तुरुंग तेथे जाऊन 'अंदमान पर्व' कथन करीत असतात

Mumbai, Thane, Dombivlikar Savarkar lovers went to Andaman and heard the Andaman Journey of Veer Sawarkar | मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व

मुंबई, ठाणे, डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन ऐकले अंदमान पर्व

डोंबिवली: सावरकरांसह अन्य कैद्यांनी भोगलेल्या हालअपेष्टांचे वर्णन करीत 'अंदमान पर्व ऐकून स्वा. सावरकरांनी त्या काळी ब्रिटिशांपुढे न झुकता भारत मातेसाठी सगळं सहन केले. डोंबिवलीकर सावरकर प्रेमींनी अंदमानात जाऊन याची डोळा याची देही ते सगळं बघितल. त्यांना व्याख्याते डॉ सच्चीदानंद शेवडे यांनी इतिहास समजावून सांगितला.

शेवडे एक तपाहुन अधिक काळ  स्वा.सावरकरांच्या आत्मार्पण दिनी अंदमानातील सेल्युलर तुरुंग तेथे जाऊन 'अंदमान पर्व' कथन करीत असतात. यंदाही त्यांनी सोमवारी तेथे सावरकर प्रेमींना संबोधित केले. सोमवारी संध्याकाळी त्यांनी पोर्ट ब्लेअर येथील सावरकर बंधू स्मृती महाराष्ट्र मंडळात सावरकरांवर विचार मांडले. त्या दोन्ही कार्यक्रमात सर्वांना मुक्त प्रवेश होता. सेल्युलर तुरुंगात व्याख्यानाचा प्रघात चालू करणारे ते पहिले व्याख्याते असल्याचा दावा शेवडे यांनी केला.

सोमवारी सकाळी बोलताना त्यांनी बालाकोट हल्ल्याच्या पंचवर्षंपूर्तीचा उल्लेख केला. त्यानंतर ' कथन केले.  सायंकाळी महा.मंडळात नागपुरातील सुरसंगम ग्रुपतर्फे गीतगुंजन हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्र गीताने आरंभ करून अमर कुलकर्णी व सुरभी ढोमणे यांनी त्यानंतर स्वा. सावरकरांची गाणी सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले.  त्यानंतर डॉ.शेवडे यांनी त्यावर कळस चढवला. त्यांनी सावरकरांचे मराठी भाषेसंदर्भातील योगदान सांगताना त्यांच्या काव्यातील उदाहरणे दिली. त्याचप्रमाणे त्यांचे सागरी दिव्य अत्यन्त प्रभावीपणे मांडत स्वराज्याचे सुराज्य करण्याचे दायित्व आपल्या खांद्यावर असल्याचे सांगितले.  एकूण सावरकर आत्मार्पण दिन आणि येणाऱ्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा नाद अंदमानात दुमदुमला असल्याची अनुभूती त्यावेळी आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mumbai, Thane, Dombivlikar Savarkar lovers went to Andaman and heard the Andaman Journey of Veer Sawarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.