जीवनदीप महाविद्यालयला नॅकचे 'बी' मानांकन; शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द
By मुरलीधर भवार | Published: October 13, 2022 03:31 PM2022-10-13T15:31:07+5:302022-10-13T15:31:21+5:30
२००४ मध्ये संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांनी गोवेली येथे जीवनदीप महाविद्यालयाची स्थापना केली. आज केजी टू पीजी शिक्षण देणारे कल्याण ग्रामीण मधील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून जीवनदीप महाविद्यालयाचा नावलौकिक आहे.
कल्याण- जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे , कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आनंददायी वार्ता म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या वतीने (नॅक) गोवेली महाविद्यालयाला 'बी'असे मूल्यांकन मंगळवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.
२००४ मध्ये संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांनी गोवेली येथे जीवनदीप महाविद्यालयाची स्थापना केली. आज केजी टू पीजी शिक्षण देणारे कल्याण ग्रामीण मधील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून जीवनदीप महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. दर्जेदार शिक्षणाबरोबरच क्रीडा सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमात महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले असून क्रीडा क्षेत्रात मुंबई विद्यापीठात महाविद्यालयाचा ९ वा क्रमांक आहे.तसेच सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, सुसज्ज ग्रंथालय, वायफाय, सौर ऊर्जा, डिजिटल क्लास रूम विविध विद्यार्थी कल्याणकारी योजना,व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ,विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व तसेच अगदी कमी कालावधीत महाविद्यालयाची झालेली उत्तरोत्तर प्रगती पाहता आज महाविद्यालयाला नॅक 'बी'मूल्यांकन प्राप्त झाले आहे
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद गुणवत्ता दर्जाला समजण्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय आणि इतर मान्यताप्राप्त विद्यालय त्यांच्या उच्च स्तरावरील शैक्षणिक मूल्यांकन करते. तसेच शैक्षणिक सुविधा आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधाच्या गुणवत्तेसाठी शैक्षणिक संस्थाचे मूल्यांकन करत असते. या मूल्यांकन समितीने २९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महाविद्यालयाला भेट देवून मूल्यांकन केले.संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये मूल्यांकन त्यांनी केले. या समितीने पाहणीचा अहवाल बेंगलोर येथील नॅकला सादर केला होता.त्यानंतर पुढील प्रक्रिया होवून नॅकच्यावतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन जाहीर करण्यात आले. त्यात महाविद्यालयालस २.३३ सीजीपीएससह 'बी'असे मूल्यांकन मिळाले आहे.
जीवनदीपच्या विश्वासार्ह सार्थ सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष घोडविंदे यांनी दिली. या यशात सर्व संस्था पदाधिकारी ,प्राचार्य,डॉ. के.बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,संचालक प्रशांत घोडविंदे, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. भाग्यश्री पवार यांचाही सहभाग आहे.