केंद्र सरकारचे नाव घ्या; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पालकमंत्र्यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 06:48 PM2022-02-17T18:48:20+5:302022-02-17T18:48:35+5:30

भेदभाव नाही; आपण एकच असल्याचे पालकमंत्र्यांचे उत्तर

Name the Central Government; Union Minister Kapil Patil urges Guardian Minister | केंद्र सरकारचे नाव घ्या; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पालकमंत्र्यांना आग्रह

केंद्र सरकारचे नाव घ्या; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पालकमंत्र्यांना आग्रह

Next

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावकर सभागृहाचे नुतनीकरण केल्यावर हे सभागृह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचे नाव घ्या अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केली असता त्यावर पालकमंत्री यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भेदभाव नाही. आपण सगळे एकच आहोत असे उत्तर देत पाटील यांच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न केला. 

स्मार्ट सिटी प्रकल्पातून खाडी किनारा विकास आणि नौदल संग्रहल उभारले जात आहे. त्याला केंद्राचा निधी प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नाव घ्या असे पालकमंत्र्यांना सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी सावरकरांचे नाव घेतले. मात्र स्मार्ट सिटीतून विकास कामे केली जात असल्याचा उल्लेख केला. त्यावर स्मार्ट सिटीला निधी केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्र सरकारचे नाव घ्या असा आग्रह धरला त्यावर पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार असा भेदभाव नाही. आपण एकच आहोत असे उत्तर पाटील यांना दिले. तसेच व्यासपीठावर भाजप आमदार रविंद्र येण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले ते मात्र खालीच प्रेक्षकांमध्ये उभे होते. त्यांनी वरती जाणो पसंत केले नाही. चव्हाण हे खाली का उभे होते याबाबत पाटील यांना विचारले असता त्यांनाच विचारा ते का खाली उभे होते असे ते म्हणाले.

कार्यक्रम संपताच केंद्रीय मंत्री पाटील यांनी सांगितले स्मार्ट सिटीला केंद्राकडून 16 कोटी 5क् लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्याठिकाणी केंद्राचा बोर्ड लावला जात नाही. कोणी बोर्ड लावला नाही तर मी त्याठिकाणी बोर्ड लावणार आहे. शहराच्या विकासात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. 

जाणारे मूळचे भाजपचे नव्हते..

भाजपचे नगरसेवक शिवसेनेत गेले ते भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आले. ते मूळचे भाजपचे नव्हते. मी सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलो. त्यांना आत्ता त्यांचे भवितव्या भाजपमध्ये वाटत नसले तरी त्यांनी असे करणो चूकीचे आहे. 
मनसेसोबत भाजपची युती याविषयी वरच्या पातळीवर चर्चा झालेली नाही. त्याबाबत खालच्या पातळीवर चर्चा असली तरी दोन व्यक्ती एकत्रित येऊन झाडाखाली चर्चा करता. ही सोयीची चर्चा आहे असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Name the Central Government; Union Minister Kapil Patil urges Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.