नमो चषकामुळे क्रीडा गुणांना चालना; सार्वनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
By मुरलीधर भवार | Published: January 9, 2024 04:55 PM2024-01-09T16:55:13+5:302024-01-09T16:56:28+5:30
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे उपस्थित होते.
मुरलीधर भवार,कल्याण: बांधाकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे केले. शहराच्या पूर्व भागातील नांदिवली परिसरात भाजप आमदार गणपत गाकवाड यांच्या वतीने नमो चषकाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण हे उपस्थित होते. या वेळी मंत्री चव्हाण यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. या प्रसंगी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी महापौर मोरेश्वर भोईर, पदाधिकारी संदीप माळी आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या उत्तम आयोजनाबद्दल आमदार गायकवाड यांचे कौतूक केले.
याप्रसंगी आमदार गायकवाड यांनी सांगितले की, शहराच्य पूर्व भागात क्रिडांगणाकरीता जी आरक्षणे आहे. ती विकसीत करण्याकरीता पाठपुरावा करीत आहे. महापालिकेत ज्यांची सत्ता आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महापालिकेने आरक्षणे ताब्यात घेतलेली नाही. बहुतांश आरक्षित भूखंडावर अतिक्रमणे आहेत. आगामी काळात या जागा महापालिका ताब्यात घेऊन त्यावर क्रिडा संकुल आणि रुग्णालये उभारली जातील अशी आपेक्षा व्यक्त केली.
येत्या १३ जानेवारी रोजी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत आहेत. याविषयी आमदार गायकवाड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आले तर शहराचा विकासच होईल. मुख्यमंत्री शहरात आल्यावर त्यांच्या नजरेत काही गोष्टी येतात. तसेच कार्यकर्ते पदाधिकारी विविध मागण्या करतात. त्याची पूर्तता होऊ शकते.