कल्याणमध्ये शंकराच्या पिंडीसमोर नंदी पितोय दूध; व्हायरल व्हिडिओनं भक्तांच्या रांगा
By मुरलीधर भवार | Published: July 12, 2023 06:56 AM2023-07-12T06:56:39+5:302023-07-12T07:01:29+5:30
कल्याण शहरातील खडेगोलवली येथील कैलास नगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात स्थापन केलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडियो काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला
कल्याण - गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याचा दावा करणाऱ्या अफवा समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार कल्याणमध्ये देखील समोर आला आहे. कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली कैलासनगर परिसरात साई बाबांच्या मंदिरात नंदी दूध आणि पाणी सेवन करत असल्याचं एक व्हिडिओ सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अफ़वा वाऱ्यासारखी पसरताच महिला पुरुष दूध, पाणी घेऊन मंदिरात धाव घेऊ लागले , काही महिलांनी आमच्या हाताने नंदीने दूध पिल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली होती.रात्री उशीराने अखेर मंदिर बंद झाले आणि गर्दी हळूहळू ओसरली.
कल्याण शहरातील खडेगोलवली येथील कैलास नगर साई शक्ती कॉलनीतील साई मंदिरात स्थापन केलेल्या नंदीची मूर्ती दूध पीत असल्याचा व्हिडियो काल सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मूर्तीला पाणी व दूध पाजण्यासाठी भक्तांची गर्दी झाली. या परिसरातील महिला,पुरुष पाणी, दूध आणून नंदीला पाजत होते. यावेळी नंदी मूर्तीला अनेक लिटर दूध,पाणी देण्यात आले. मंदिराभोवती भाविकांची वर्दळ होती.भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या पुजाऱ्याने पूजा केली..त्यानंतर नंदीच्या मूर्तीच्या तोंडाजवळ दुधाने भरलेला चमचा ठेवताच नंदी दूध प्राशन करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. पुजाऱ्याने ही बाब मंदिरातील भाविकांना सांगितले.
कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली कैलासनगर परिसरात साई बाबांच्या मंदिरात नंदी दूध आणि पाणी पित असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल #Kalyanpic.twitter.com/YaKPEuVqxX
— Lokmat (@lokmat) July 12, 2023
नंदी दूध पीत असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला अवघ्या काही क्षणात नंदी दूध पीत असल्याचे बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पाहता पाहता भाविकांनी नंदीच्या मूर्तीला दूध अर्पण करण्यास सुरुवात केली. लोक वाट्या, ग्लास इत्यादींमध्ये दूध घेऊन मंदिरात पोहोचले आणि चमच्याने नंदी महाराजांच्या मूर्तीला दूध पाणी पाजू लागले. काही वेळातच भाविकांनी मंदिरात गर्दी केली सायंकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली ही गर्दी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती