नौदलाकडून टी-८० युद्धनौका केडीएमसीला सूपूर्द; दोन दिवसात कल्याण दुर्गाडी येथे होणार आगमन

By मुरलीधर भवार | Published: February 4, 2023 05:06 PM2023-02-04T17:06:42+5:302023-02-04T17:07:59+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडी किनारी नौसेना संग्रहालय उभारत आहे.

navy hands over t 80 warship to kdmc arrival at kalyan durgadi in two days | नौदलाकडून टी-८० युद्धनौका केडीएमसीला सूपूर्द; दोन दिवसात कल्याण दुर्गाडी येथे होणार आगमन

नौदलाकडून टी-८० युद्धनौका केडीएमसीला सूपूर्द; दोन दिवसात कल्याण दुर्गाडी येथे होणार आगमन

googlenewsNext

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडी किनारी नौसेना संग्रहालय उभारत आहे. त्यासाठी टी-८० युद्धनौका महापालिकेस देण्याचा सामंजस्य करा नौसेनेकडून यापूर्वीच झाला आहे. ही युद्धनौका आज कुलाबा डॉकयार्ड येथे महापालिकेच्या हाती सूपूर्द करण्यात आली. येत्या दोन दिवसात या युद्ध नौकेचे आगमन दुर्गाडी खाडीकिनारी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या साक्षीने मराठा आरमाराची स्थापना दुर्गाडी खाडी किनारी केली होती. मराठा आरमाराचे स्मारक उभे करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नौसेनेचे संग्रहालय उभे राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून टी-८० युद्ध नौका उभी केली जाणार आहे. भारतीय नौसेना दलाचा महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीसोबत नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. आज कुलाबा येथील डॉक यार्ड येथे टी-८० युद्ध नौका महापालिकेस सूपूर्द करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र नौदल रिअल अॅडमिरल ए. ए. प्रमोद, कमांडर जिलेट कोशी, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डॉ. विजय सूर्यवंशी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, शहर अभियंता अर्जून अहिरे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी मान्यवर उपस्थित होते. 

आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. माजी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, नौसेना संग्रहालयास मराठा आरमार स्मारकात नौसेनेच्या युद्ध नौका जतन करण्याची संकल्पना मी मांडली. ती प्रत्यक्षात साकार होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. टी-८० या युद्धनौकेमुळे कल्याण मधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पुढील पिढ्यांसाठी प्रथमच या युद्धनौकेच्या स्वरूपात एक प्रेरणादायी स्मारक किल्ले दुर्गाडी येथे उभारले जाणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: navy hands over t 80 warship to kdmc arrival at kalyan durgadi in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.