बुलेट ट्रेनचा खर्च विकासासाठी करावा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

By मुरलीधर भवार | Published: September 23, 2023 03:48 PM2023-09-23T15:48:53+5:302023-09-23T15:50:16+5:30

बुलेट ट्रेनवर होणार खर्च हा विकासावर व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

NCP MLA Rohit Pawar demands that bullet train should be spent for development | बुलेट ट्रेनचा खर्च विकासासाठी करावा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

बुलेट ट्रेनचा खर्च विकासासाठी करावा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

googlenewsNext

कल्याण-बुलेट ट्रेनवर दील लाख कोटी रुपये खर्च करुन त्याचे तिकीट विमान प्रवासा इतकेच असणार आहे. तर लोक बुलेट ट्रनने का जातील. त्यानी विमानाने प्रवास करणे काय वाईट असेल. या ट्रनेच्या १२ स्टेशन पैकी चार स्टेशन महाराष्ट्रात असताना त्या प्रकल्पाचा ५० टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलावा. लाेकल ट्रेन सेवा सुधारावी. तसेच सर्व लोकल एसी करुन त्यांचे तिकट स्वस्त करावे. राज्यातील गरीब विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परिक्षांकरीता राज्य सरकार १ हजार रुपये शुल्क घेते. त्यामुळे बुलेट ट्रेनवर होणार खर्च हा विकासावर व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर चर्चा होत असली तरी पवार अदानीसह छोट्या व्यावसायिकांना भेटत असतात. सगळ्यांना भेटल्याशिवाय राज्याचा विकास आपल्याला कसा करता येईल. पा’लिसी ठरविण्याकरीता या भेटी होत असतात असे स्पष्टीकरण आमदार पवार यांनी दिले आहे. निवडणूक आयागाेने पक्षाची भूमिका घेण्यापेक्षा लाेकशाहीची भूमिका घेतली पाहिजे असेही आमदार पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही आरक्षणाचा मुद्दा मांडत होतो. तेव्हा भाजप राजकारण करीत होती. आत्ता ते सत्तेत आहेत. ते काय निर्णय घेतात. ते पाहावे लागेल. याकडे आमदार पवार यांनी लक्ष वेधले.

राहूल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या सुनावणीसाठी आणखी काही वेळ लागेल असे सांगितले होते. त्यावर आमदार पवार यांनी सांगितले की, नार्वेकर वेळ लागत लागेल असे म्हणत असतील तर त्यांनी तीन महिने काय केले हे त्यांनी राज्याला सांगावे. अध्यक्ष म्हणून त्यांनी निर्णय लवकर घेतला पाहिजे. त्यांना दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावे लागते ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणे आणि जपण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून नार्वेकरांचीच आहे, असा टोला ही लगावला आहे.

काल लोक ट्रेनने आणि आज दुचाकीवरुन प्रवास
आमदार पवार हे दोन दिवस कल्याण दौऱ््यावर असल्याने आज सकाळीच टिटवाळा येथील महागणपती मंदीरात जाऊन दर्शन घेतले. त्यांना एका कार्यकर्त्याने घरगुती दर्शनाकरीता आग्रह केल्याने त्यांनी त्यांचा ताफा सोडून ते चक्क मोटार सायकलवर बसून कार्यकर्त्याच्या घरी गेले. काल त्यानी कल्याण गाठण्यासाठी ट्रेनने प्रवास केला होता.

Web Title: NCP MLA Rohit Pawar demands that bullet train should be spent for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.