वरिष्ठ पातळीवर सुपाऱ्या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा आरोप
By मुरलीधर भवार | Published: April 13, 2024 02:42 PM2024-04-13T14:42:13+5:302024-04-13T14:42:29+5:30
सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे.
कल्याण- पक्षातील वरिष्ठ पातळीवर अनेक गैरव्यवहार चालू असतात. पक्षातील काही मंडळी असतात ज्यांनी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही असा गंभीर आरोप जिजाऊ प्रतिष्ठानचे प्रमुख निलेश सांबरे यांनी केला आहे.
सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर वंचितने उमेदवारांची जी यादी जाहीर केली होती, त्यामध्ये कल्याण लोकसभेतून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र वंचितकडून ती टायपिंग मिस्टेक झाली होती. आम्ही वंचितला पाठिंबाची मागणी केली होती, तसा पाठिंबा त्यांनी दिल्याचे सांबरे यांनी सांगितले.
कल्याण लोकसभेतून लढवायचा निर्णय घेतल्यावर कल्याणमध्ये १५ बैठका घेतल्या. मात्र त्या सभेमध्ये कोणालाही आयआयटी बद्दल माहित नाही, यापेक्षा मोठे दुर्भाग्य आमच्या जव्हार मोखाड्यात देखील नाही,असे देखील सांबरे म्हणाले. कल्याण पश्चिमेत भागात सांबरे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळेस ते बोलत होते.