एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:55 PM2022-02-02T18:55:49+5:302022-02-02T18:57:15+5:30

डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

no factory will relocate strong opposition from manufacturers to dombivli midc decision | एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध

एकही कारखाना स्थलांतरीत करणार नाही; डोंबिवली एमआयडीसीच्या निर्णयाचा कारखानदारांकडून तीव्र विरोध

Next

कल्याण: डोंबिवलीतील रासायनिक, धोकादायक आणि अतिधोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा डोंबिवलीतील कारखानदारांनी तीव्र विरोध करीत एकही कारखाना स्थलांतरीत केला जाणार नाही असा इशारा एमआयडीसी प्रशासनास दिला आहे. 

हा निर्णयाची माहिती मिळताच डोंबिवलीतील कारखानदार अभय पेठे यांनी सांगितले की, एकही कारखाना इथून कुठेही स्थलांतरीत केला जाणार नाही. या निर्णयाची अधिकृत माहिती आम्हाला कळविली गेलेली नाही. डोंबिवलीतील कारखान्यात काम करणा:या कामगारांचे काय करणार. रस्त्यावर अपघात होता म्हणून रस्ते बंद केले जातात का. तोच न्याय कारखान्यांना का नाही?

कारखानदार श्रीकांत जोशी यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून याठिकाणी कारखाने आहेत. काही अपघात झाले असल्यास त्याच्या कारणावरुन कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय चुकीचा आहे. पाताळगंगा हे ठिकाण लांब आहे. कारखान्यातील मशीनरी कुठे नेणार. कामगारांचे काय करणार. तसेच जे कारखानदार वयोवृद्ध झाले ते अन्य ठिकाणी कारखाना कसा काय चालविणार असे विविध प्रश्न जोशी यांनी उपस्थित केले आहेत. बफर झोनचा पट्टा ठेवला नाही. ही जबाबदारी कोणाची होती. नागरीकरणाला परवानगी कोणी दिली. नागरीकांना बाहेर काढा.

कामा या कारखानदारी संघटनेचे माजी अध्यक्ष संजीव काटेकर यांनी सांगितले की, कामा संघटनेची काही एक बोलणी न करता. कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.
 

Web Title: no factory will relocate strong opposition from manufacturers to dombivli midc decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.