पैसे भरुनही मीटर नाही, भाजपा आमदार संतापले; वीज वितरणच्या अधिकाऱ्यावर केली आगपाखड

By मुरलीधर भवार | Published: February 16, 2023 05:44 PM2023-02-16T17:44:09+5:302023-02-16T17:45:56+5:30

वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

No meter even after paying, BJP MLA angry; Electricity distribution officer fired | पैसे भरुनही मीटर नाही, भाजपा आमदार संतापले; वीज वितरणच्या अधिकाऱ्यावर केली आगपाखड

पैसे भरुनही मीटर नाही, भाजपा आमदार संतापले; वीज वितरणच्या अधिकाऱ्यावर केली आगपाखड

googlenewsNext

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह्द्दीत असलेल्या आशेळे परिसरात सहा महिन्यापूर्वी पैसे भरुन देखील वीज वितरण कंपनीकडून इमारतीमधील नागरीकांना मीटर दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना अंधारात राहावे लागत आहे. हा प्रकार कळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्याठिकाणी धाव घेतली. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत जाेपर्यंत मीटर दिला जात नाही. तोपर्यंत याठिकाणीहून हलणार नाही असा इशारा देत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

आशेळे परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून काही इमारतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे .वीज चोरी प्रकरणी बिल्डर विरोधात महावितरणने कारवाई केली. मात्र याचा फटका इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना बसला. पैसे भरल्यानंतर सहा महिने उलटून गेले तरी अद्याप मीटर कनेक्शन न दिल्याने येथील नागरिक सहा महिन्यापासून अंधारात आहेत. याबाबत आज आमदार गायकवाड यांनी परिसरात जाऊन महावितरण अधिकार्यांना धारेवर धरत त्यांना जाब विचारला. 

जोपर्यंत वीज पुरवठा केला जात नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका आमदार गायकवाड यांनी घेतले. यावेळी आमदार गायकवाड यांनी टेबल खालून पैसे घेऊन मीटर लावले जातात कायदेशीर रित्या पैसे भरलेल्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप महावितरणवर केला. याबाबतचा व्हिडियो असल्याचे देखील आमदारांनी सांगितले कसा प्रकारे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांचा कामकाज कशा प्रकारे सुरू याचा खुलासा देखील आमदार गायकवाड यांनी अधिकारी वर्गाचा समोर केला. त्यानंतर वीज वितरण कंपनीने सावध पवित्रा घेत याची चौकशी केली जाईल. या इमारतीचे रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन दिली जाईल असे सांगितले.
 

Web Title: No meter even after paying, BJP MLA angry; Electricity distribution officer fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.