माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 08:09 IST2025-02-17T08:09:20+5:302025-02-17T08:09:34+5:30

आपण सगळे जिल्ह्यात फिरलो, तरच जनता समाधानी होणार असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

No one has held as many public darbars as I have: Ganesh Naik | माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

माझ्याएवढे जनता दरबार कोणी घेतले नसतील : गणेश नाईक  

कल्याण : माझ्याएवढे जनता दरबार कुठल्याही मंत्र्यांनी घेतले नसतील. जनतेला त्यांचे दु:ख सांगण्याकरिता एक व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही जिल्ह्यात येऊन जनतेशी संवाद साधावा. आपण सगळे जिल्ह्यात फिरलो, तरच जनता समाधानी होणार असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

कल्याणमध्ये स्मारक व्हावे

सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन शनिवारी पश्चिमेकडील सुभेदारवाडा शाळेत करण्यात आले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह आ. संजय केळकर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी नाईक म्हणाले की, रामभाऊ यांनी कधीही कोणाचा दुस्वास ठेवला नाही. अशा नेत्याच्या आठवणी आपल्या कायम लक्षात राहतील, यासाठी त्यांचे कल्याण शहरात स्मारक व्हावे यासाठी ठराव करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: No one has held as many public darbars as I have: Ganesh Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.