‘कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही’ - आमदार रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 07:04 IST2025-03-20T07:04:25+5:302025-03-20T07:04:59+5:30
बैठकीला रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेच आयुक्त, ठाणे, रायगड, पालघर व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

‘कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही’ - आमदार रवींद्र चव्हाण
मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतीमधील एकाही रहिवाश्याला बेघर होऊ देणार नाही व सर्व रहिवाशांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल अशी ठाम भूमिका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी घेतली. या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या चार दिवसात चारही विभागांच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल व या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
बैठकीला रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी यांच्यासह विभागाचे अधिकारी, कल्याणडोंबिवली महापालिकेच आयुक्त, ठाणे, रायगड, पालघर व मुंबई शहरचे जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते.
हा विषय गंभीर आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवली आयुक्त, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी व महारेरा या चारही विभागांशी संबधित अधिका-यांशी बैठक घेऊन या विषयासंदर्भात सविस्तर माहिती सादर करावी. या विषयावर तोडगा काढताना एक विशेष प्रकरण म्हणून तोडगा काढण्यात यावा. तसेच या हजारो रहिवाशांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सकारात्मक मार्ग काढण्यात यावा.
रवींद्र चव्हाण, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष