फूटपाथवरील गरिबांना पालिका रुग्णालयातही जागा नाही का? मन हेलावून टाकणारी घटना उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 07:34 PM2021-02-17T19:34:56+5:302021-02-17T19:36:58+5:30
old man death on footpath in Kalyan: एका गरीब रुग्णाला रुग्णालयात नेले असता त्याला दाखल करुन न घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना.
कल्याण पश्चिमेतील साई हॉलच्या समोर फूटपाथवर एक वयोवृद्ध आजारी अवस्थेत पडला होता. त्याला उपचारासाठी दोन जणांनी रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले असता त्याला दाखल करुन न घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिली आहे. (Old Man Died On Kalyan Footpath)
६० वर्षीय वृद्ध आजारी अवस्थे पडल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरया यांनी पोलिस व रुग्णालयाशी संपर्क साधला. त्याला उपचार मिळाले पाहिजे. यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी दोन जणांनी पुढाकार घेतला. त्याला रुग्णालयाने दाखल न करुन घेतल्याने त्याला रुणालयाच्या कर्मचा:यांनी पुन्हा फूटपाथवर सोडल्याचा आरोप त्याच्यासोबत असलेल्यांनी केला आहे. त्यामुळे हा व्यक्ती पुन्हा फूटपाथवर आढळून आाला. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्याच्या मृत्यूला रुग्णालयातील कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप बोरगावकर यांनी केला आहे. त्या व्यक्तीचे नाव शांताराम असे होते.
दरम्यान यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्या व्यक्तिला जे दोन लोक रुग्णालयात घेऊन गेले. त्यांना त्याठिकाणच्या कर्मचा:यांनी केसपेपर काढण्यास सांगितले. त्यांनी केसपेपर न काढता त्याला घेऊन गेले. तो व्यक्ति पुन्हा फूटपाथवर आढळून आला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यासाठी पुन्हा रुग्णवाहिका पाठविण्यात आली. त्याला उपचाराला रुग्णालयात घेऊन येत असता त्याचा वाटेत मृत्यू झाला. या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य वैद्यकीय अधिका:यांना दिले आहेत.