थर्टी फर्स्टच्या रात्री १२०० पोलिसांची करडी नजर; अनुचित प्रकार घडल्यास कारवाई
By मुरलीधर भवार | Published: December 30, 2023 08:52 PM2023-12-30T20:52:45+5:302023-12-30T20:53:01+5:30
अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचे आवाहन
कल्याण- कल्याण आणि उल्हासनगर पोलिस परिमंडळाच्या हद्दीत थर्टी फर्स्टसाठी १२०० पोलिसांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. नागरीकांनी नववर्ष स्वागताचा आनंद लुटावा. मात्र अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे आवाहन अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे.
थर्टी फर्स्ट रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. विविध हा’टेल्स, धाबे यांना पोलिसांनी योग्य त्या सुचना दिल्या आहेत. रात्रीच्या वेळी दारु पिऊन गाडी चालवू नये. हेल्मट घालूनच गाडी चालवावी. दारु पिऊन गाडी चालविल्यास ब्रेथ अ’नालझर यंत्राद्वारे तपासणी केली जाईल. दारु पिऊन गाडी चालविल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नववर्ष स्वागताचा आनंद लूटावा. मात्र कायद्याचे उल्लंघन करु नये असे अप्पर पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.
कल्याण आणि उल्हासनगर पोलिस परिमंडळाच्या हद्दीत प्रत्येकी आठ पोलिस ठाणी येतात. या ठिकाणी १२०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कोंबिंग आणि सर्च आ’परेशन आज रात्रीपासून सुुरु करण्यात आले आहे. १२०० पोलिसांमध्ये साध्या वेशातील पोलिसही फिरणार आहेत. तसेच दोन्ही पोलिस परिमंडळाच्या हद्दीतील सीसीटीव्ही द्वारेही नववर्षाच्या स्वागतावर नजर ठेवली जाणार आहे. नागरीकांनी नववर्षाचे स्वागत करीत असताना त्यांच्या सुरक्षेची हमी पोलिस प्रशासनाची असेल असे अप्पर पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.