थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याणमध्ये २२७ जणांनी केले रक्तदान
By मुरलीधर भवार | Published: January 1, 2024 04:41 PM2024-01-01T16:41:43+5:302024-01-01T16:42:37+5:30
थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मुरलीधर भवार,कल्याण: काल थर्टी फर्स्टच्या रात्री कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणात रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २२७ जणांनी रक्तदान केले.
रक्तानंद ग्रुपचे सरचिटणीस नारायण पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २८ वर्षापासुन हा उपक्रम सुरु आहे. हा उपक्रम धर्मविर आनंद दिघे यांनी सुरु केला होता. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या हस्ते राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार पालघर जिल्ह्य़ातील वाडा येथील राजेंद्र वाघचौडे यांना देण्यात आला. वाघचौडे यांनी ४२ वेळा रक्तदान केले आहे. तर ठाण्याचे निलेश शिनलकर यांना रक्तकर्ण पुरस्काराने गौरविले गेले. शिनलकर यांनी २५ वेळा रक्तदान केले आहे. रक्तानंद गृपचे माजी अध्यक्ष बाळ हरदास, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे , डोंबिवली उपजिल्हाप्रमुख तात्या माने जिल्हासमन्वयक धनंजय बोडारे , उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, शहर प्रमुख शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्यास रक्तदाता ट्राॅफी आणि मध्यरात्रीचा रक्तदाता सन्मानपत्र देण्यात आले. मुंबई , ठाणे , पालघर डोंबिवली, बदलापूर, धुळे, नाशिक , वाशी येथुन रक्तदाते या शिबीरात सहभगी झाले होते.आजपर्यंत ७६ हजार रक्त बाटल्या गरजु रुग्णांना दान करण्यात आल्या आहेत. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तकर्ण रविंद्र कडणे , संजय पेंढारी , आप्पा अतकरे , समिर वेदपाठक, नितीन खारवे , दिनेश साळुंके , कमलाकर इंदुलकर , संजय पांचाळ , नामदेव खापरे आदींनी मेहनत घेतली.