श्रीराम नामाच्या" गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश
By अनिकेत घमंडी | Updated: April 17, 2024 16:46 IST2024-04-17T16:45:36+5:302024-04-17T16:46:26+5:30
श्री रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम नामाच्या" गजरात ही मतदान जनजागृतीचा संदेश
अनिकेत घमंडी, डोंबिवली: श्री रामनवमीचे औचित्य साधून बुधवारी कल्याण लोकसभा क्षेत्रात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २४ -कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत १४२- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील स्विप पथकाने महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी उल्हासनगर स्टेशन जवळ राम नवमी उत्सव साजरा होत असताना जनजागृती करण्यात आली.
त्याचप्रमाणे वसार गाव येथे रामनवमी निमित्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मतदान जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला व नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले, यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून तेथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.