महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 09:40 PM2020-12-01T21:40:35+5:302020-12-01T22:29:35+5:30

राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

One lakh assistance from Dr. Shrikant Shinde Foundation for the treatment of Shripati Khanchanale | महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला

महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला

Next

कोल्हापूर - येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फ़े आज 1 लक्ष रुपयांची लाख मोलाची मदत सुपूर्द करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपरोक्त सर्वांनी अतिदक्षता विभागात पैलवान श्रीपती खंचनाळे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. आरोग्य राज्य मंत्री श्री यड्रावकर यांनी यावेळी श्री. खंचनाळे यांच्या उपचारासाठी शासनामार्फतही  आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही दिली. 
 
कोल्हापूरमध्ये डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महाराष्ट्रातील पहिले हिंदकेसरी श्री. खंचनाळे यांच्याबाबतची बातमी समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डाॕ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा सूचना  दिल्या होत्या. तसेच उपचारामध्ये विशेष लक्ष देण्यात यावे यासाठी डायमंड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ साई प्रसाद यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संवाद साधला होता. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही आज आवर्जून श्रीपती खंचनाळे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाशी तसेच आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेशी संवाद साधला. यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री खंचनाळे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ साईप्रसाद व डॉ कौस्तुभ यांचे विशेष आभार मानले.  यापुढील काळातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुस्तीपटूना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क करावा, आपण कुस्तीपटूसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत अशी ग्वाही यावेळी डॉ शिंदे यांनी दिली. 

तर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तसेच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्यात येते , यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिवसेना भवन येथील मुख्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले. 

यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

Web Title: One lakh assistance from Dr. Shrikant Shinde Foundation for the treatment of Shripati Khanchanale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.