पोक्सो अंतर्गत एकाला सक्तमजुरीची शिक्षा, कल्याण न्यायालयाचा निकाल

By सचिन सागरे | Published: July 19, 2023 06:59 PM2023-07-19T18:59:37+5:302023-07-19T19:01:00+5:30

त्यावेळी, तेथून जाणाऱ्या दोघांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला पिंट्याच्या तावडीतून सोडवले.

One sentenced to hard labor under POCSO, Welfare Court verdict | पोक्सो अंतर्गत एकाला सक्तमजुरीची शिक्षा, कल्याण न्यायालयाचा निकाल

पोक्सो अंतर्गत एकाला सक्तमजुरीची शिक्षा, कल्याण न्यायालयाचा निकाल

googlenewsNext

कल्याण : अनैतिक कृत्य करण्याच्या इराद्याने एका अल्पवयीन मुलीला झाडाझुडपात घेऊन जाणाऱ्या पिंट्या देवमन जाधव (३५, रा. अहमदनगर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

सप्टेंबर २०१९ मध्ये पीडिता घराजवळ दुध आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी, पिंट्याने पिडीतेला रस्त्यात अडवले व तिचे केस पकडून तिला उचलून घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या पिडीतेने आरडओरडा केला. त्यावेळी, तेथून जाणाऱ्या दोघांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला पिंट्याच्या तावडीतून सोडवले. 

याप्रकरणी पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पिंट्याविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गजानन कोचरेकर यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार भालचंद्र द. पवार यांनी मदत केली.
 

Web Title: One sentenced to hard labor under POCSO, Welfare Court verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.