"विरोधकांनी आकांडतांडव बंद करावा", शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा विरोधकांना सल्ला
By मुरलीधर भवार | Published: May 11, 2023 04:37 PM2023-05-11T16:37:32+5:302023-05-11T16:39:05+5:30
राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
कल्याण - विराेधकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा दिलदारपणे स्वीकार करुन आकांडतांडव बंद करावा असा सल्ला शिंदे गटाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी विराेधकांना दिला आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाने आज निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार भोईर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द व्हावे म्हणून विरोधक देव पाण्यात ठेवून बसले होते. काहींनी मिठाई ,ढोल ताशाची ऑर्डर दिली होती. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य होता. कारण आम्ही न्यायालयाचा , लोकशाहीचा, संविधानाचा आदर करणारे आहोत.
न्यायालयाने शिंदे सरकारच्या बाजूने निर्णय दिला आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. १६ सदस्या बाबत निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे विरोधक आकांड तांडव करतायत तो त्यांनी थांबवावा आणि मोठ्याने मनाने दिलदारपणे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करा असा सल्ला विरोधकांना दिला आहे.