गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

By प्रशांत माने | Published: October 12, 2023 06:10 PM2023-10-12T18:10:21+5:302023-10-12T18:10:34+5:30

कोंडीची स्थिती उदभवू नये याकरिता या भागातील वाहतूकीत बदल केले गेले आहेत.

Organization of Garba festival, changes in road traffic in Dombivli | गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: नवरात्रौत्सवात पुर्वेकडील नांदिवली रोडवरील डिएनसी ग्राऊंडवर शिवसेनेतर्फे गरबा उत्सव आयोजित केला जातो. त्याठिकाणी होणारी गर्दी पाहता वाहतुककोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कोंडीची स्थिती उदभवू नये याकरिता या भागातील वाहतूकीत बदल केले गेले आहेत. यानिमित्ताने डोंबिवली शहर वाहतुक उपविभागाच्या वतीने अधिसूचना काढण्यात आली आहे.

नांदीवली रोडवरून एकतानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून दत्तनगर चौकाकडे येणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. रविवार १४ ऑक्टोबर ते मंगळवार २४ ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नांदीवली रोडवरून दत्तनगर चौकाकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक/ एकता नगर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक/एकतानगर चौक येथून उजवे वळण घेवून संगीतावाडी अथवा पांडुरंगवाडी मार्गे इच्छीत स्थळी जातील अशी माहीती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलिस निरिक्षक उमेश गित्ते यांनी दिली. हे वाहतुकीतील बदल पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असेही गित्ते यांनी सांगितले.

Web Title: Organization of Garba festival, changes in road traffic in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.