गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमीच्या अल्ट्रा दौडचे आयोजन

By मुरलीधर भवार | Published: February 1, 2024 07:36 PM2024-02-01T19:36:39+5:302024-02-01T19:36:50+5:30

डोंबिवली-गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमी च्या अल्ट्रा दौड चे आयोजन रनर्सक्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने करण्यात ...

Organized 65 km ultra race from Gateway of India to Dombivli | गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमीच्या अल्ट्रा दौडचे आयोजन

गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमीच्या अल्ट्रा दौडचे आयोजन

डोंबिवली-गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमी च्या अल्ट्रा दौड चे आयोजन रनर्सक्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने करण्यात आलेले आहे
गेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली असे ६५ किमी.अल्ट्रा दौड आयोजित करून देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या आणि आम्हा देशवासीयांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दलात सेवा बजावणार्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करुन त्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी एक दौड वीर जवानोंके लिए असे घाेषवाक्य आहे. या दौडचे हे चौथे वर्ष आहे.

ही दौड ३ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु होईल . ४ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ८:३० दरम्यान डोंबिवलीतील आप्पा दातार चौक गणपती मंदीर येथे पूर्ण केली जाईल. तिचा मार्गगेटवे ऑफ इंडिया ,मंत्रालय, एनसीपीए, हुतात्मा चौक, पी डिमेलो मार्ग, शिवडी, वडाळा,सायन सर्कल, चेंबूर, वाशी बस डेपो,कोपरखैरणे,महापे, शिळफाटा, विको नाका, कॅ.विनयकुमार सच्चान स्मारक, चार रस्ता मार्गे आप्पा दातार चौक असा आहे. डोंबिवली कल्याण किंवा जवळपासच्या गावातून भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, निमलष्करी दल,पोलिस, इ. संरक्षण क्षेत्रात भरती होउ इच्छिणा-या होतकरू तरूणांसाठी / तरुणींसाठी भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी निधी जमा करणे. येत्या वर्षभरामध्ये असे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि अद्ययावत ग्रंथालय उभे करण्याचे उद्दीष्ट् संस्थेने आखले आहे.

या दौडमध्ये जागतिक पातळीवरील मॅरेथॉन गाजविणारे काॅम्रेड्स धावपटू, आयर्नमॅन मानांकित अल्ट्रा धावपटू ,मॅरेथॉन रनर्स , उदयोन्मुख धावपटू, तसेच डोंबिवली,कल्याण, ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, मध्य प्रदेश, दिल्ली आदी ठिकाणाहून जवळजवळ ३०० धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच डॉक्टर,इंजिनिअर,उद्योजक, निवृत्त अधिकारी असे समाजातील विविध स्तरातील लोकांचा सहभाग आहे. धावपटुंचे स्वागत करण्यासाठी नागरीकांनी रविवारी सकाळी आप्पा दातार चौक यावे असे आवाहन रनर्स क्लॅन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Organized 65 km ultra race from Gateway of India to Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.