शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

By अनिकेत घमंडी | Published: December 25, 2023 05:00 PM2023-12-25T17:00:54+5:302023-12-25T17:02:49+5:30

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले.

Organized Bharat Sankalp Yatra for the government schemes to reach the common man; Minister Ravindra Chavan | शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन;  मंत्री रवींद्र चव्हाण 

अनिकेत घमंडी ,डोंबिवली: शासकीय योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदान येथे झाला, त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवा, यासाठी या योजना केवळ कागदावर नसाव्यात या दृष्टिकोनातून ही विकसित संकल्प भारत यात्रा सुरू करण्यात आली आहे, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तर या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकेल असेही ते म्हणाले. 

यावेळी भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव ,सहा. आयुक्त स्नेहा करपे, चंद्रकांत जगताप इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभारंभाला भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस मंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला. त्यानंतर विकसित संकल्प भारत यात्रा शपथ उपस्थितांमार्फत देण्यात आली.

चव्हाण यांनी लाभार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉल्सला भेटी देऊन उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला. शुभारंभानंतर सकाळच्या सत्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ३३५ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला.

Web Title: Organized Bharat Sankalp Yatra for the government schemes to reach the common man; Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.