महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व सभेचे आयोजन 

By अनिकेत घमंडी | Published: June 10, 2024 12:48 PM2024-06-10T12:48:30+5:302024-06-10T12:48:41+5:30

शोभायात्रेतील महाराणा प्रतापांच्या वीरतेच्या गीतांमुळे उत्साह पसरला होता.

Organizing a grand procession and meeting on the occasion of Maharana Pratap Jayanti  | महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व सभेचे आयोजन 

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व सभेचे आयोजन 

डोंबिवली:  महाराणा प्रताप यांच्या ४८४ व्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा गांधी चौकातून प्रारंभ होवून छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन करून पारनाका येथे समाप्त झाली. समाजातील सर्व स्तरातील मंडळी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सामिल झाली होती. शोभायात्रेतील महाराणा प्रतापांच्या वीरतेच्या गीतांमुळे उत्साह पसरला होता.

शोभायात्रेनंतर आनंदी गोपाळ सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत बोलतांना प्रमुख  वक्ते मुकुंद उपाध्याय यांनी महाराणा प्रतापांचे जीवन व त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला. त्याच बरोबरीने त्यांनी वर्तमान परिस्थितीत कुटुंबात एकजूट राखण्याचे महत्वही प्रतिपादन केले.

त्या कार्यक्रमात कल्याण मेडिकल असोसिएशनचे डॉ. प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम राष्ट्र प्रेमी सकल हिंदू समाज व श्री रामदेव भक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ज्यात राजस्थानी समाजासहित सगळ्यांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
 

Web Title: Organizing a grand procession and meeting on the occasion of Maharana Pratap Jayanti 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.