कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन

By मुरलीधर भवार | Published: February 1, 2023 06:02 PM2023-02-01T18:02:39+5:302023-02-01T18:02:48+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शाखेच्या वतीने महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Organizing Maha Arogya Camp, Cyclothon and Children's Festival in Kalyan | कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन

कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन

googlenewsNext

कल्याण-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शाखेच्या वतीने महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आयोजनाची माहिती देण्यासाठी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी मोहन उगले, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, छाया वाघमारे, नेत्रा उगले आदी उपस्थित होते. शहराच्या पश्चिम भागातील सिद्धी विनायक हॉलमध्ये ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजताच्या वेळेत महा आरोग्य शिबीर होणार आहे.

५ फेब्रुवारी रोजी १८ वर्षे वयोगटाखालील आणि १८ वर्षे वयोगटाच्या वरील अशा दोन वयोगटात सायक्लोथॉन स्पर्धा सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी दुर्गाडी येथून घेतली जाणार आहे. त्यासाठी ७०० सायकलस्वारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्याचबरोबर ७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव क्रिडा संकुलात सकाळी ८ ते १० वाजताच्या वेळेत बालमहोत्सव घेतला जाणार आहे. त्यात २०० शाळामधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नृत्य, चित्रकला, गायन, रांगोळी निबंध स्पर्धामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जाणार आहे.

Web Title: Organizing Maha Arogya Camp, Cyclothon and Children's Festival in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण