कल्याणमध्ये एमसीएचआयकडून प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन; बडे गृह प्रकल्प तयार करणारे 35 बिल्डर होणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:05 PM2022-05-13T18:05:37+5:302022-05-13T18:06:55+5:30
अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 लाख ते दीड कोटी रुपये किंमतीची घरे आहेत.
कल्याण- एमसीएचआय या बिल्डर संघटनेच्या वतीने कल्याणमध्ये येत्या 19 ते 22 मे दरम्यान प्रॉपर्टी एक्सपो 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघनटेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष शितोळे यांनी, ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जयेश तिवारी, अरविंद वरक, सुनिल चव्हाण, राहूल कदम, दिनेश मेहता, राजेश गुप्ता, रवी पाटील, रोहित दिक्षीत, संजय पाटील, अनिरुद्ध पाटील आदी उपस्थित होते.
अध्यक्ष शितोळे यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवलीत 40 लाख ते दीड कोटी रुपये किंमतीची घरे आहेत. सीटी सेंटरीकमध्ये ही किंमत आहे. तर शहराच्या आऊट स्कर्टमध्ये 20 लाखापासून घरे उपलब्ध आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीत परवडणारी घरेही निर्माण केली जात आहेत. कोरोना काळानंतर घर खरेदीत तेजी पाहावयास मिळत आहे. चेन्नई येथील बिल्डरांनी बांधकाम साहित्याचे दर वाढवल्याने घराच्या किंमती वाढविल्या आहे. मात्र कल्याण डोंबिवली, अशा प्रकारे बांधकाम साहित्याचे दर वाढवून त्याचा बोजा ग्राहकाच्या माथी मारलेला नसून तो बोजा सध्या तरी बिल्डर सहन करीत आहे.
शहराविषयी असलेली बांधिलकी पाहता. संघटनेने शहरातील 25 पेक्षा जास्त रस्ते संघटनेने सुशोभित केलेले आहे. मात्र त्या रस्त्यांचे दुभाजक तुटल्यास ते दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे, हातगाड्या, बेकायदा टपऱ्या हटविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरू आहे. याशिवाय रिंग रोडचे काम आहे. हे प्रकल्प मार्गी लावल्यास या ठिकाणी सुरु असलेल्या गृह प्रकल्पात घरे घेण्यासाठी अन्य शहरातील लोकही आकर्षित होतील, असा विश्वास शितोळे यांनी व्यक्त करीत याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज शितोळे यांनी व्यक्त केली आहे.