कल्याणात लग्नसोहळ्याचे आयोजन; गरसेवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 06:47 PM2021-04-04T18:47:45+5:302021-04-04T18:47:54+5:30
कल्याण पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉनमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या वर पोहचली आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे " माझे कुटुंब माझी जबाबदारी " व "मी जबाबदार " असे म्हणत वारंवार कोरोना परस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिलंय. मात्र असे असले तरी कल्याणातील शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवतायेत. कल्याणात शिवसेनेच्या माजी नगरसेवक व नगरसेविका दांपत्याच्या मुलीचं लग्न हजारो नागरिकांच्या उपस्थित पार पडलं. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी इतक्या दणक्यात हा सोहळा संपन्न होत असताना पोलीस नेमकं काय करत होते? असा सवाल निर्माण झालाय.
कल्याण पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉनमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नसोहळ्याला हजारो नागरिकांची गर्दी दिसून आली आहे.सोशल डीस्टंसिग सोडा मात्र साधा मास्क घालण्याची तसदी देखील नागरिकांनी घेतली।नव्हती. यासंबंधीचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय . काही दिवसांपूर्वी कल्याण पुर्वेतील सेनेचे नगरसेवक नवीन गवळी यांचा देखील वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झालेला.
शहरात गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींना सामाजिक भान नसल्याचं समोर येतंय. महापालिका विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करतेय. मग या सोहळ्यातल्या नागरिकांकडून पण दंड वसूल केला जाईल का? कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? मुख्यमंत्री , तसेच सेनेचे जिल्हा नेतृत्व आधी आपल्या पक्षातील प्रतिनिधींचे कान उपटतील का? असे एक।ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.