कोळसेवाडीतील महिला पोलिसांची भरली ओटी; नूतन ज्ञान मंदिर शाळेचा सामाजिक बांधीलकीचा दुर्वाकूर उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 04:26 PM2021-10-13T16:26:38+5:302021-10-13T16:27:47+5:30
संरक्षण देण्यात आपला आनंद मानणा:या या महिला पोलिसांचा गौरव नूतन विद्या मंदिर शाळेने केला आहे.
कल्याण- छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन ज्ञान मंदिर शाळेने सामाजिक बांधिलकीचा दुर्वाकूर उपक्रमांतर्गत शिक्षिकांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात कर्तव्य बजाविणा:या महिला पोलिसांची आज ओटी भरली. महिला पोलिसांचा शाळेच्या शिक्षिकांनी नवरात्री निमित्त केलेला सन्मान पाहून महिला पोलिसांच्या चेह:यावर समाधान झळकले.
महिला पोलिस पोलिस ठाण्यात आपले कर्तव्य बजावित असतात. सद रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य घेऊन काम करणा:या महिला पोलिस एक प्रकारे नव दुर्गेचे रुप आहेत. ज्या सर्व सामान्यांचे संरक्षण करतात. सण उत्सव घरी साजरे न करता पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असतात.
संरक्षण देण्यात आपला आनंद मानणा:या या महिला पोलिसांचा गौरव नूतन विद्या मंदिर शाळेने केला आहे. कर्तव्य बजाविणा:या महिला पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असावा. त्यांना समाजाकडून चांगले सहकार्य मिळावे असे आवाहन शाळेच्या शिक्षिकांनी केली. यावेळी कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी निता भोईगडे यांच्यासह अन्य महिला पोलिस उपस्थित होत्या. हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गागरे यांच्या प्रेरणोतून करण्यात आला. त्याला उपमुख्याध्यापक बबन निकुम आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांचे सहकार्य लाभले.