"आमचे बंड महाविकास आघाडीच्या विरोधात; आजही आम्ही शिवसैनिकच"
By मुरलीधर भवार | Published: July 15, 2022 03:11 PM2022-07-15T15:11:01+5:302022-07-15T15:13:10+5:30
शिवसेना संपविण्याचा डाव राष्ट्रवादीचा होता. निधी मिळत नव्हता. हा विचार घेऊन आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणो उभे राहिले.
कल्याण- आमचे बंड हे महाविकास आघाडीच्या विरोधात होते. आम्ही शिवसैनिकच आहोत. आम्ही दुस:या पक्षात प्रवेश केलेला नाही. तरी देखील आम्हाला गद्दार ठरविणार असतील तर त्यांनी गद्दारीची व्याख्या काय हे सांगावे असा सवाल कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार भोईर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेना संपविण्याचा डाव राष्ट्रवादीचा होता. निधी मिळत नव्हता. हा विचार घेऊन आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणो उभे राहिले. आमचे नेते एकनाथ शिंदे आहे. तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आहे. कोरोना काळात पक्ष प्रमुखांशी भेट होत नव्हती. ठाणो जिल्ह्यात आमचा संपर्क आमचे नेते शिंदे यांच्याशीच होता. पाच वर्षात कामे झाली नाही तर मतदार आम्हाला प्रश्न विचार की, विकास कामे काय झाली त्याला उत्तर काय देणार असे भोईर यांनी सांगितले. मात्र आत्ता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या सरकारला आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या काळात कल्याणमध्ये आणखीन विकास कामे होती. यापूर्वी पत्री पूल, दुर्गाडी पूल, रिंग रोड आदी कामे झालेली आहेत.
आमदार भोईर हे कल्याण शिवसेना शहर प्रमुख पदी आहेत. शिंदे गटात सामिल झाल्यावर त्यांच्या शहर प्रमुख पदाविषयी चर्चा होती. याविषयी भोईर यांनी सांगितले की, शहर प्रमुख पदाचा राजीमामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझी नियुक्ती पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांना पसंत असेल तर ते पदावर ठेवतील. हा सर्वस्वी निर्णय ठाकरे यांचाच असेल.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचा नाव देण्याबाबत भोईर यांना प्रश्न विचारल असता भोईर यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांचा नाव देण्याबाबतचा जो निर्णय आहे. तो मंत्रिमंडळात होईल. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेले नाही. दि. बांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरू . हा इथल्या भूमिपूत्रंचा भाविनक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आहे.