डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Published: February 14, 2024 10:15 AM2024-02-14T10:15:39+5:302024-02-14T10:17:04+5:30

लहान मुलांनी टीव्ही, मोबाइल कमी बघावा आणि मैदानात खेळ खेळायला यावे : मिलिंद कुलकर्णी

Over 3000 students from 70 schools responded to the Dombivli Olympics | डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

डोंबिवली ऑलिम्पिकला ७० शाळांमधून तीन हजार विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

डोंबिवली: विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहण्याचा कालावधी कमी करावा आणि मैदानावर जास्त उपस्थिती लावावी असे आवाहन रोटरीचे (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी रिजन्सी अनंतम ग्राउंड, डोंबिवली ऑलम्पिक स्पर्धांचे दोन दिवसीय आयोजन केले होते, त्या स्पर्धांमध्ये तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती बुधवारी देण्यात आली.

कुलकर्णी यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या बत्तीस वर्षे सुरू असणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. त्या कार्यक्रमाचे उदघाटन कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी पूर्वप्रांतपाल डॉ उल्हास कोल्हटकर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ता प्रीती गाडे व सहाय्यक प्रांतपाल शैलेश गुप्ते हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ डोंबिवली रोटरी ऑलिंपिक चे ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने झाला. डॉन बॉस्को शाळेच्या दोन बँड पथकाच्या तालावर सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचा मार्च पास झाला. त्या कार्यक्रमानंतर दावडी येथील छत्रपती शिवाजी मंडळाने लाठी काठी, दांडपट्टा, तलवारबाजी या क्रीडा प्रकारांची चित्ताथरारक प्रात्यक्षिक सादर केली. 

डोंबिवली ऑलम्पिक मध्ये डोंबिवलीतील जवळजवळ ७० शाळांनी सहभाग घेतला होता. खो खो, लंगडी, कबड्डी, ॲथलेटिक्स, लांब उडी, गोलाफेक, कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धात कल्याण डोंबिवलीतील ३००० शालेय मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला.

डोंबिवलीकरांनी हजर राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कबड्डी प्रो निलेश शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावून या स्पर्धा संयोजनाबद्दल कौतुक केले आणि भविष्यातही रोटरी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा चालू राहिल्या पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथ लोटे यांनी रोटीरी ऑलिंपिक ची पार्श्वभूमी आणि क्लबच्या विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन रो. विनायक आगटे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यात डोंबिवली तील सहभागी शाळा, शिक्षक, परीक्षक विद्यार्थी, आणि डोंबिवली कर क्रीडाप्रेमींचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे लोटे म्हणाले. संस्थेचे मानद सचिव डॉ. महेश पाटील, प्रकल्प प्रमुख रो सतीश अटकेकर व प्रकल्प संचालक रो. कमलाकर सावंत आणि त्यांचे टीमने दोन दिवसाचे रोटरी ऑलिम्पिक यशस्वी केल्याबद्दल त्यांचे सगळ्यांनी कौतुक।केले. 

Web Title: Over 3000 students from 70 schools responded to the Dombivli Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.