कल्याणातील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला
By मुरलीधर भवार | Published: June 14, 2024 06:08 PM2024-06-14T18:08:39+5:302024-06-14T18:09:59+5:30
किल्ल्याची युद्ध पातळीवर डागडुजी करा शिंदे सेनेची मागणी
मुरलीधर भवार, कल्याण: येथील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा काही बाग कोसळल्याची घटना काल रात्रीच्या सुमारासघडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ््यांसह शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ््यांनी पाहणी केली. किल्ल्याची युद्ध पातळीवर डागडुजी करावी अशी मागणी केली शिंदे सेनेकडून करम्यात आली आहे.
पुराततत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्यांनी केला . मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी २५ कोटीचा निधी देण्याचे मान्य केले .त्यामधील पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. आत्तापर्यंत दोन कोटी ५० लाख रुपये खर्चाचे काम झाले आहे. उर्वरीत कामआचारसंहितेमुळे पूर्ण होऊ शकले नाही अशी माहिती शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.
या पूर्वी किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी बुरुजावर बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे बुुरुजाचा काही भाग ढासळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कल्याणमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र केवळ तीनच दिवस काही अंशी पाऊस पडला. या पावसाचा बुरुजाला फटका बसला असण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात पुन्हा बुरुजाला फटका बसू नये याची काळजी अधिकारी वर्गाकडून घेतली जावी अशी मागणी शिंदे सेनेच्या पदाधिकारी वर्गाकडून यावेळी करण्यात आली.