केमिस्ट असोसिएशन प्रतिनिधी मंडळाचा ब्रिसबेन येथील जागतिक परिषदेत सहभाग
By अनिकेत घमंडी | Published: September 24, 2023 10:47 AM2023-09-24T10:47:59+5:302023-09-24T10:48:07+5:30
अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या माध्यमातून दौरा
डोंबिवली - अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन चे प्रतिनिधी मंडळ ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन या शहरात आयोजित एफआयपी वर्ड काँग्रेस मध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत. अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास दौरा होत आहे.
ब्रिसबेन या ठिकाणी आयोजित परिषदे मध्ये फार्मसी क्षेत्रात जागतिक स्तरावर होणाऱ्या घडामोडी यासह विविध विषयांवर संवाद सत्र होणार आहे. भारतातून प्रथमच 70 पेक्षा जास्त फार्मासिस्ट 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या परिषदेत सहभागी होत असल्याचे संस्थेच्या डोंबिवली शाखेचे निलेश वाणी यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन बदलाची माहिती भारतातील फार्मासिस्ट ला मिळावी व सामान्य माणसास उत्तम सेवा मिळावी हा राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा उद्देश आहे. या परिषदेच्या माध्यमातून मिळणारी माहिती सहभागी प्रतिनिधी आपआपल्या भागातील फार्मासिस्ट ला देतील ज्यामुळे भारतातील फार्मासिस्ट अद्ययावत होऊन उत्कृष्ट रुग्ण सेवा मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र मध्ये देखील केमिस्ट असोसिएशन व फार्मसी कौन्सिल च्या माध्यमातून जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रम च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जातो. यामध्ये विविध उपक्रम सोबत अवयव दानाचे महत्वही समाजात रूढ करणे यावर।विशेष भर दिला जाईल तसेच रोग निदान शिबीर उकृष्ठ फार्मासिस्ट पुरस्कार अश्या विविध उपक्रम चा यात समावेश असेल अशी माहिती राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.