आरपीएफ कॉन्स्टेबल अन् ट्रेन गार्डच्या अलर्टमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:05 PM2021-06-12T19:05:46+5:302021-06-12T19:06:10+5:30

प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना गार्डचाही तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर खाली पडले. आरपीएफ कॉन्स्टेबल कानोजिया यांनी तातडीने गार्डला सुरक्षीतपणे खाली खेचले

Passenger's life saved due to alert of RPF constable and train guard | आरपीएफ कॉन्स्टेबल अन् ट्रेन गार्डच्या अलर्टमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

आरपीएफ कॉन्स्टेबल अन् ट्रेन गार्डच्या अलर्टमुळे वाचले प्रवाशांचे प्राण

Next
ठळक मुद्देप्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना गार्डचाही तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर खाली पडले. आरपीएफ कॉन्स्टेबल कानोजिया यांनी तातडीने गार्डला सुरक्षीतपणे खाली खेचले

डोंबिवली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे मुंबई-मंगळुरु विशेष या चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना एक प्रवासी खाली पडला. ११ जून रोजी ही दुर्घटना घडली, त्यावेळी ट्रेन गार्ड, जीतेंद्र पाल आणि आरपीएफ कॉन्स्टेबल नरसिंह कनोजिया यांनी त्यांना चाकांखाली येण्यापासून वाचवले. 

प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना गार्डचाही तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर खाली पडले. आरपीएफ कॉन्स्टेबल कानोजिया यांनी तातडीने गार्डला सुरक्षीतपणे खाली खेचले. त्यानंतर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही गाडी थांबविली आणि गार्ड ट्रेनमध्ये चढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या दुर्घटनेतील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने शनिवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

रेल्वे वेगवेगळ्या स्तरावरुन या जीवघेण्या वर्तनाविरूद्ध जनजागृती करीत आहे आणि प्रवाशांना विनंती करीत आहे की, त्यांच्या जीवासाठी धोकादायक असल्याने चालती गाडीमध्ये चढू/उतरू नये प्रवाशांना असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Web Title: Passenger's life saved due to alert of RPF constable and train guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.