लोकल पुढे मालगाडी पुढे काढण्याचे निर्णय रेल्वे प्रशासन थेट घेतं, कसारा मार्गावरील प्रवासी हैराण
By अनिकेत घमंडी | Published: August 23, 2023 12:50 PM2023-08-23T12:50:24+5:302023-08-23T12:50:52+5:30
उद्घोषणा यंत्राद्वारे कोणतीही सूचना देत नाही, कधी अर्धा तास विलंब तर कधी थेट लोकल रद्द
डोंबिवली: कसारा, आसनगाव या भागात जोरदार नागरीकरण होत असताना रेल्वेच्या अनियोजनाचा फटका येथील विकासाला बसत आहे. कसारा, आसनगाव जाणाऱ्या प्रत्येक लोकल पुढे मालगाडी, मेल, एक्सप्रेस पुढे काढण्याने लोकल उशिरा करण्याचा निर्णय कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर घेण्यात येत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
कसारा आसनगाव दरम्यान अप डाउन मार्गावर मालगाडीत बिघाड झाल्याच्या घटना वाढत असल्याने यामागील लोकल सुमारे अर्धातास विलंबाने येणे किंवा काहीवेळा थेट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील रेल्वे प्रवासीना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या नवीन मार्गिकेचे काम सद्यस्थितीत बंद असल्याने लोकलसेवा अत्यल्प असल्याची टीका कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी केली.
रेल्वे प्रशासनाने लोकल पुढे मालगाडी, मेल, एक्सप्रेस काढून लोकल उशिरा करू नये याबाबत कल्याण-कसारा मार्फत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले तरी प्रशासन काही केल्याने सुधारणा करत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत, यात तातडीने सुधारणा व्व्हावी अशी मागणी करण्यात आली.