'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 09:36 PM2021-10-02T21:36:49+5:302021-10-02T21:37:35+5:30

Varun Sardesai : कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई कल्याणात आले होते.

'People know who is working', reply from Varun Sardesai to Amit Thackeray | 'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

googlenewsNext

कल्याण : कल्याणडोंबिवलीतील खड्डयांच्या स्थितीवरून मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नुकतेच एक विधान केले होते. या विधानाला आता युवासेना सचिव वरुण देसाई यांनी प्रत्युत्तर  दिले आहे. स्थानिक पातळीवर कोण काम करत आहे, हे सर्वांना माहीत आहे, असे ते म्हणाले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई कल्याणात आले होते.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी मनसेचे युवानेते अमित ठाकरेही कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनेला शुक्रवारी लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले अमित ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नवीन पूल, रस्ते यांच्यासह महत्वाच्या विकासकामांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरती कोण काम करत आहे, याबाबत लोकं समजूतदार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. 

शनिवारी कल्याण पूर्व- कल्याण पश्चिम तर रविवारी उल्हासनगर, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा आढावाही ते घेणार असल्याची माहिती युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांनी दिली.

Web Title: 'People know who is working', reply from Varun Sardesai to Amit Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.