ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील
By मुरलीधर भवार | Published: April 27, 2024 09:16 PM2024-04-27T21:16:34+5:302024-04-27T21:17:09+5:30
विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर
मुरलीधर भवार-कल्याण: ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात असे प्रतिउत्तर भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
खासदार पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाटील यांनी जातीला पाहून मतदान करु नका. विकासाला मतदान करा असे आवाहन केले होते. हा व्हीडीआे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सोशल मिडियावर व्हायरल केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देताना खासदार पाटील यांनी सांगितले, कुठलाही समाज जातीवर जाऊन मतदान करीत नाही. जनता सगळी सुशिक्षित झाली आहे. पण काही लोकांना अशा प्रकारे आधार घ्यावा लागता. ते जनतेची दिशाभूल करीत असतात. माझा मुद्दा असा आहे की, जनतेने विकासाच्या मुद्यावर मतदान करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरु आहे. आणी म्हणून कुठल्याही समाजाला जातीवर मतदान करण्याचे आवाहन मी तरी कधी करीत नाही. कोणी करु ही नये. आपण विकासाच्या मुद्यावरच निवडणूका लढविल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते. त्याला लोकांना कुठला ना कुठला आधार हवा असतो. म्हणून ते जनतेची दिशाभूल करीत असतात असे पाटील यांनी सांगितले.